MAKH

मा.ना.श्री.हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विदूत पुरवठा समस्याबाबत बैठक संपन्न… 

महोदय,                                                                                                                                                                                        कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील विदूत पुरवठा समस्याबाबत मा.ना.श्री.हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री यांच्या समवेत आज रविवार दिनांक १०/१२/२०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता कागल येथील त्यांच्या घरी मॅक पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, निमंत्रित सदस्य अभिजीत पाटील, बाळासाहेब धुळुगडे व मॅक चे मान्यवर सभासद अविनाश सोनी यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील विदूत पुरवठा समस्या बाबत माहिती दिली.

लघु, मध्यम व मोठ्या अशा जवळपास ३५ ते ४० उद्योजकांनी उद्योगासाठी लागणारी वीज मिळणेकरिता महावितरण कार्यालयाकडे अर्ज दाखल केले असून त्यांना विदूत पुरवठा उपलब्ध होत नसलेबाबत सांगितले. महावितरणच्या ३३/११ केव्ही पंचतारांकित औद्योगिक उपकेंद्रामध्ये ३३ केव्ही चा फिडर बे व इतर  पायाभूत सुविधा तातडीने करणे अत्यंत गरजेचे असून त्याकरिता लागणार्‍या निधीची तरतूद सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२०२४ अंतर्गत करण्यात यावी अशी संस्थेच्या वतीने मागणी करण्यात आली व उद्योजकांना लवकरात लवकर विदूत पुरवठा उपलब्ध करणेकरिता सहकार्य करावेत अशी विनंती करण्यात आली.

मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांनी सांगितले की, सदरचा विषय मी नागपूर येथे सदया सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये मांडून तो सोडविण्यासाठी संबंधित मंत्री महोदय व अधिकारी वर्ग यांना विनंती करेन व लवकरात लवकर महावितरण कार्यालाकडून इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून विदूत पुरवठा उद्योजकांना मिळणेकरिता सहकार्य करू अशी ग्वाही दिली. तसेच महावितरणच्या ३३/११ केव्ही पंचतारांकित औद्योगिक उपकेंद्रामध्ये ३३ केव्ही चा फिडर बे व इतर पायाभूत सुविधा करिता लागणार्‍या निधीची तरतूद सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२०२४ अंतर्गत करणे बाबत दिनांक १९ व २० डिसेंबर २०२३ च्या होणार्‍या बैठकीत विषय मांडून निर्णय घेवू असे सूचित केले.