MAKH

मॅक च्या प्रांगणात ७५ वा प्रजासत्ताक दिन मा.श्री.किरण पाटील साहेब यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न…

 मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणगले (मॅक) च्या प्रांगणात मा.श्री.किरण पाटील साहेब, चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर, घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि. यांच्या शुभहस्ते  ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. सदरच्या ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थित असणार्‍या मा.श्री.किरण पाटील साहेब, चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर, घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि., अग्निशमन अधिकारी श्री. मिलिंद सोनवणे, सेवा दवाखाना (ईएसआय) डॉक्टर व त्यांचे सहकारी तसेच मॅक चे सर्व संचालक, निमंत्रित सदस्य व मान्यवर उद्योजकांचे स्वागत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी केले.

मा. श्री. किरण पाटील साहेब यांचा मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व बुके देवून सत्कार करण्यात आला तसेच इतर उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार मॅक च्या विविध पदाधिकारी यांच्या हस्ते बुके देवून करण्यात आला.

मा. श्री. किरण पाटील साहेब यांचा मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व बुके देवून सत्कार करण्यात आला तसेच इतर उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार मॅक च्या विविध पदाधिकारी यांच्या हस्ते बुके देवून करण्यात आला. 

उद्योगाशी निगडीत असणार्‍या दैनंदिन घडामोडी, विविध शासकीय परिपत्रके व माहिती उद्योजकांना त्वरीत उपलब्ध व्हावी या हेतूने मॅक च्या वतीने सुरू केलेल्या “फाईव्ह स्टार न्यूज” या नूतन मासिकाच्या आवृत्तीचे प्रकाशन मा. श्री. किरण पाटील साहेब यांच्या शुभहस्ते व मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, फाईव्ह स्टार न्यूज चे संपादक अशोक दुधाणे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, उप संपादक संजय पेंडसे तसेच मॅक चे मान्यवर संचालक, सल्लागार व निमंत्रित सदस्य मान्यवर सभासद उद्योजक बंधूंच्या उपस्थितीत करण्यात आले.

 मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेने १६ वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा सर्वासमोर मांडला तसेच संस्थेच्या सदयाच्या सुरू असलेल्या नूतन इमारत बांधकाम व निधीबाबत माहिती उपस्थित मान्यवरांना दिली.

आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. श्री. किरण पाटील साहेब यांनी ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व उद्योग, व्यवसाय बाबत जगातील होत असलेल्या घडामोडी बाबत सविस्तर माहिती दिली. मेक इन इंडिया, डीफेन्स इत्यादी बाबत माहिती दिली व त्याच्या धर्तीवर उद्योगांची प्रगती होत चालली असलेचे नमूद केले. तद्नंतर मॅक पदाधिकारी व पचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सर्व मान्यवर उद्योजकांचे त्यांनी विशेष आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास अग्निशमन अधिकारी मिलिंद सोनवणे व त्यांचे सहकारी, सेवा दवाखाना स्टाफ, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन.सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन.ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक अशोक दुधाणे, संजय पेंडसे, संजय जोशी, यशवंत पाटील, अमृतराव यादव, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील, स्विकृत संचालक शिवाजी भोसले तसेच निमंत्रित सदस्य अभिजीत पाटील, बाळासाहेब धुळूगडे, मॅक चे माजी संचालक जयराज पाटील, कॉंन्ट्रक्टर वैभव हांजे मॅक चे मान्यवर उद्योजक बंधू भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार ऑन.ट्रेझरर सुरेश क्षीरसागर यांनी मानले.

कळावे,  

आपले विश्वासू,

हरिश्चंद्र धोत्रे – अध्यक्ष

मोहन कुशिरे – उपाध्यक्ष

विठ्ठल पाटील- ऑन. सेक्रेटरी

सुरेश क्षीरसागर- ऑन. ट्रेझरर, मॅक