MAKH

मॅक नवीन इमारत मधील पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू

मॅक च्या मान्यवर उद्योजक सभासद बंधूंच्या सहकार्यातून साकारण्यात येत असलेल्या भव्य अशा “मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले” (मॅक)च्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबची सुरवात आज बुधवार दिनांक 13/3/2024 रोजी सकाळी १०.०० वाजता मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, संचालक मुबारक शेख  व कॉंट्रॅक्टर वैभव हांजे

यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. सदर स्लॅब च्या अनुषंगाने कामकाजाबाबत मॅक बिल्डींग कमिटीचे अध्यक्ष संजय जोशी व मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे यांनी पहाणी केली.