MAKH

H-Block येथे LED स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम सुरु

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे MAKH च्या वतीने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित अंतर्गत (H, F & T) ब्लॉक मधील  रस्त्यालगत LED स्ट्रीट लाईट बसविणे बाबत केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे एकूण रक्कम रुपये  66 लाख मंजुर झाले असून H- ब्लॉक मधील अंतर्गत रस्त्यालगत LED स्ट्रीट लाईट बसविणेचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सबंधित कंत्राटदाराने सुरू केले आले आहे.

तसेच पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित F व T ब्लॉक  ठिकाणी LED स्ट्रीट लाईट बसविणेचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लवकरच सुरू होत असून पूर्ण करण्यात येणार आहेत याची मान्यवर सभासद बंधूंनी नोंद घ्यावी ही विनंती.

कळावे,                         

हरिश्चंद्र धोत्रे, अध्यक्ष

मोहन कुशिरे,उपाध्यक्ष

विठ्ठल पाटील, ऑन.सेक्रेटरी

सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर, मॅक