MAKH

मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांच्या समवेत बैठक संपन्न

कागल-हातकणंगले पंचतारांकित औदयोगिक वसाहतीमधील असणार्‍या विविध समस्या सोडविणेबाबत आज गुरुवार दि. ०६ मे  २०२४ रोजी  *श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांच्या समवेत मॅक व गोशिमा औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी यांची बैठक कॉमन फॅसिलिटी सेंटर हॉल, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाली.

सर्व प्रथम सदर बैठकीत मॅक व गोशिमा च्या वतीने मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर तसेच श्री. गजेंद्र लोहार, पोलीस निरिक्षक कागल व श्री. दिगंबर गायकवाड पोलिस निरिक्षक गोकुळ शिरगाव यांचे स्वागत करण्यात आले.

सदर बैठकीत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर व संचालक कुमार पाटील, मुबारक शेख व निमंत्रित सदस्य विशाल कामते यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील खालील समस्या सोडविणेबाबत मॅक च्या वतीने विनंती केली व समस्यांचे निवेदन दिले.   

१. पंचतारांकित  औद्योगिक वसाहतीमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात यावे तसेच पेट्रोलिंग बाबत व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज पाठविणे, QR कोड माहिती देणे व सोमवारी  सुट्टी  दिवशी मोठ्या प्रमाणात करण्यात यावे.

    २. एन एच 4 – नॅशनल हायवे (लक्ष्मी टेकडी) येथे ट्राफीक पोलीस नियुक्ती करणे.

    ३. नवीन होत असलेल्या पोलीस चौकी करिता लागणारा स्टाफ उपलब्ध करून देणे.

    ४. अतिक्रमण काढणे करिता पोलिस बंदोबस्त मिळणे.

५. अवैधधंदे बंद करणे.

६. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये घडत असलेले गुन्हे, अपघात बाबत नोंद गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन येथे नोंद करून घेणे.

    ७. सुरक्षेच्या दृष्टीने सिसिटीव्ही कॅमेरे बसविणे करिता एकत्रितपणे पहाणी करणे.

  ८. चोरी व लूटमार प्रकार थांबविणे करिता योग्य ती उपाय योजना करणे तसेच ज्या मालाची चोरी झाली आहे त्या मालाच्या किमती ऐवढी चोरीची नोंद दाखल करून घेणे.

  ९. मॅक चौक येथील मुख्य रस्त्यावरती लावणेत येणार्‍या चारचाकी वाहनावर कारवाई करणे.

 १०. परप्रांतीय कामगार वर्ग यांची माहिती ठेवणे.

 ११. लक्ष्मी टेकडी ते हुपरी या मुख्य रस्त्यावर चार चाकी व टू व्हीलर स्पीड लिमिट बाबत कारवाई करणे.

 १२. अनाधिकृत खंडणी / देणगी / वर्गणी मागणी करिता येणार्‍या फाळकुटदार यांचे वरती कारवाई करणे.

 १३. एन एच 4 – नॅशनल हायवे वरील सुरू असणारे ६ लाईन कामकाज करणार्‍या कंत्राटदार यांना  सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूकीस अडथळा होणारा नाही व वळण ठिकाणी योग्य ते नामफलक रिफ्लेक्टेड लावणेस सूचित करणे.

मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब —

– मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब यांनी सांगितले की, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सदया सुरू असलेल्या पेट्रोलिंग मध्ये वाढ करणेत येईल तसेच व्हाट्सअप ग्रुप तयार करून पेट्रोलिंगचे मेसेज पाठविणेत येईल व  QR कोड माहिती संकलन करणेत येईल.

पोलीस चौकी करिता लागणारा स्टाफ उपलब्ध करून देण्यासाठी मा. जिल्हापोलीस प्रमुख यांना विनंती करू व स्टाफ उपलब्ध करून देवू तसेच एन एच 4 – नॅशनल हायवे वरील (लक्ष्मी टेकडी) येथे सकाळी व सायंकाळी च्या वेळेस ट्राफिक पोलीस उपलब्ध करून करू असे नमूद केले.

तद्नंतर त्यांनी अतिक्रमण काढणे करिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडून तारीख कळविण्यात यावी त्या दिवशी आम्ही बंदोबस्त उपलब्ध करून देवू तसेच  अवैधधंदे बंद करणे करिता योग्य ती कार्यवाही आम्ही त्वरीत करू अशी ग्वाही दिली.

कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही ठिकाणी काही गुन्हे, अपघात, चोरी अथवा इतर काही बाबी घडल्यास सदरची नोंद ही उद्योजकांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला करण्यात यावी त्याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आमच्या कार्यालयाच्या वतीने सूचित करीत आहोत व त्यांची नोंद घेण्यात येईल असे सांगितले.

सिसिटीव्ही कॅमेरे बसविणे करिता लोकेशन ठरविणेसाठी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे प्रतींनिधी देण्यात येईल व लागणारी मदत केली जाईल तसेच चोरी व लुटमारीचे प्रकार घडू नयेत या करिता आम्ही गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढ करू व त्याबाबत दक्षता घेवू व  संबंधित ज्या स्क्रॅप गोळा करणार्‍या महिला वर्ग टोळ्या आहेत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करू असे नमूद केले.

अनाधिकृत खंडणी /वर्गणी मागणी करिता येणार्‍या फाळकुटदार टोळी बाबत उद्योजकांनी त्वरीत पोलीस स्टेशनशी संपर्क करावा व माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करणे सोईचे होईल असे नमूद केले.

मॅक चौक येथील मुख्य रस्त्यावरती लावणेत येणार्‍या चारचाकी वाहनावरती पोलीस कारवाई करतील तसेच औद्योगिक क्षेत्रात परप्रांतीय काम करीत असलेल्या कामगार वर्ग यांची माहिती संकलित करून आपणास लवकरच देण्यात येईल असे सूचित केले.

पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद करणेकरिता अथवा अन्य कारणाकरिता येणार्‍या प्रत्येक उद्योजकास, व्यक्तीस पोलीस स्टेशनमधील असणार्‍या स्टाफकडून योग्य प्रकारे माहिती व सहकार्य करण्यात येईल याची दक्षता घेवू असे नमूद केले.

एन एच 4 – नॅशनल हायवे वरील सुरू असणारे ६ लाईन कामकाज करणार्‍या कंत्राटदार यांना  

सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूकीस अडथळा होणारा नाही व वळण ठिकाणी योग्य ते नामफलक

रिफ्लेक्टेड लावणे बाबत संबंधित अधिकारी यांचेकडून सूचित करू सांगितले.

वरील सर्व विषयावरती सविस्तरपणे चर्चा करण्यात आली व त्या सोडविणेसाठी नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाशी  मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब यांनी दिली.

सदर बैठकीस मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, श्री. गजेंद्र लोहार, पोलीस निरिक्षक कागल व श्री. दिगंबर गायकवाड पोलिस निरिक्षक गोकुळ शिरगाव तसेच मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, गोशिमा अध्यक्ष नितिन दलवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅक चे ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक मुबारक शेख, कुमार पाटील, निमंत्रित सदस्य विशाल कामते तसेच गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्रातील इतर मान्यवर उद्योजक उपस्थित होते.

 कळावे,                       

हरिश्चंद्र धोत्रे,अध्यक्ष

मोहन कुशिरे,उपाध्यक्ष                                                                                                                                                             विठ्ठल पाटील,ऑन.सेक्रेटरी

सुरेश क्षीरसागर,ऑन. ट्रेझरर

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक)