MAKH

मा.उद्योगमंत्री यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विविध विषयाबाबत बैठक संपन्न….   

काल शनिवार दिनांक ३१/०८/२०२४ रोजी मा.ना.श्री. उदय सामंत साहेब, उद्योगमंत्री यांची हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे व संचालक अनिल जाधव यांनी भेट घेतली व  संस्थेच्या वतीने खालील विषयावरती सविस्तर चर्चा केली आणि सदर विषय सोडविण्यासाठी विनंती केली.

उद्योजकांना अखंडीत विदूत पुरवठा मिळणेकरिता महावितरण / मऔवि महामंडळ कार्यालयकडून इन्फ्रास्ट्रक्चर त्वरीत उपलब्ध करून देणे    

मा.उद्योगमंत्री साहेब यांनी सांगितले की, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र येथे नवीन सबस्टेशन उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून भूखंड नं. पी-८२ एकूण क्षेत्र ४८१० स्के.मी. हा महावितरण कार्यालयास दिला असून नवीन सबस्टेशन उभारणी बाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे आला आहे. सदर प्रस्तावास लवकरच महावितरण / मऔवि महामंडळ कार्यालयकडून मंजूरी देवू व नवीन सबस्टेशन उपलब्ध करून उद्योजकांना वीज उपलब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.        

कागल-हातकणंगले पंचतारांकित औदयोगिक वसाहतीमधील उर्वरित ब्लॉक मध्ये एलईडी स्ट्रीट लाईट बसविणेबाबत मा.उद्योगमंत्री यांनी सदर विषयाच्या अनुषंगाने संगीतले की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔवि महामंडळ, मुंबई यांच्याकडे सदर प्रस्ताव आला सदर प्रस्तावास लवकरच मंजूरी देत असून उर्वरित कागल-हातकणंगले पंचतारांकित औदयोगिक वसाहतीमध्ये एलईडी स्ट्रीट लाईट बसविणेचे काम लवकरच पूर्ण होईल असे सूचित केले.