MAKH

स्ट्राईव्ह प्रकल्पा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मॅक च्या विद्यार्थ्यांना स्मॅक आयटीआय कडून प्रमाणपत्र प्रदान.

फाईव्ह स्टार – एमआयडीसी : ११ सप्टें. :‌ स्मॅक आयटीआय कडून स्ट्राईव्ह प्रकल्पा अंतर्गत क्लासरूम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मॅक च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम मॅक च्या श्रीराम प्रताप झंवर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला.

केंद्र सरकारच्या स्ट्राईव्ह प्रकल्पाच्या सुरुवातीपासून मॅक चे सर्व पदाधिकारी , संचालक व निमंत्रित सदस्य यांच्या अथक प्रयत्नामुळे चांगल्या प्रकारे प्रवेश संख्या झाल्याचे प्रतिपादन मॅक चे चेअरमन हरिश्चंद्र धोत्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये केले तसेच मॅकच्या होऊ घातलेल्या बेसिक ट्रेनिंग सेंटर ची माहिती दिली.

कार्यक्रमास‌ मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे , मॅक स्ट्राईव्ह प्रकल्पाचे अध्यक्ष संजय पेंडसे , स्मॅक चे उपाध्यक्ष जयदीप चौगले , आयटीआय चे चेअरमन प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मॅक ने स्ट्राईव्ह प्रकल्पाचा उत्कृष्टरित्या प्रचार प्रसार करून गरजू मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी योग्य मार्गदर्शन केल्याचे प्रशांत शेळके यांनी सांगितले तसेच मॅक च्या बेसिक ट्रेनिंग साठी स्मॅक कडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही ही त्यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी स्मॅक चे उपाध्यक्ष जयदीप चौगले , स्मॅक आयटीआयचे प्राचार्य प्रसन्न खेडेकर , इन्स्ट्रक्टर ए. एस. हसुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्मॅक आयटीआय कडून उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम [ एम. ए. पी. एस. ] ची माहिती देऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास मॅक चे ऑ. सेक्रेटरी विठ्ठल पाटील , खजानिस सुरेश क्षीरसागर , संचालक ‌, निमंत्रित सदस्य , उद्योजक , सेक्रेटरी शंतनू गायकवाड आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन स्ट्राईव्ह प्रकल्प पीआरओ योगेश गिजवणे यांनी तर आभार प्रदर्शन स्ट्राईव्ह कमिटी प्रमुख संजय पेंडसे यांनी केले