नूतन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म उदघाटन समारंभ संपन्न - MAKH

MAKH

नूतन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म उदघाटन समारंभ संपन्न

कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील सर्व उद्योजकांना कळविण्यास आनंद होत आहे की,मॅक च्या वतीने उद्योजकांना विद्युत पुरवठा त्वरित उपलब्ध व्हावा या हेतूने महावितरण कार्यालयाकडे सतत संस्थेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे महावितरण मायनर सबस्टेशन येथे नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म मंजूर झाला असून त्याचे उदघाटन महावितरण चे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते व मा.दत्तात्रय भनगे कार्यकारी अभियंता,मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे,ऑन सेक्रेटरी विठ्ठल पाटील, संचालक भावेश पटेल व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

मा. हरिश्चंद्र धोत्रे- अध्यक्ष मॅक

मॅक च्या माध्यमातून सतत उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करते असते. त्याचा एक भाग म्हणून    उद्योजकांना भासत असलेल्या विद्युत पुरवठा बाबत असणार्‍या अडचणी लक्षात घेवून महावितरणच्या कार्यकारी अभियंता बनगे साहेब व इतर अधिकारी यांचा मायनर सबस्टेशन* येथे नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म मंजूर करणे करिता पाठपुरावा मॅक च्या वतीने करण्यात आला व त्याचे उदघाटन आज झाले असून आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. सदर नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म कार्यान्वित करणे करिता महावितरणच्या सर्वच अधिकारी वर्ग विशेषतः कार्यकारी अभियंता बनगे साहेब व त्यांच्या टीम चे कौतुक केले व  आभार व्यक्त केले.

 नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म कार्यान्वित झाल्यामुळे सिल्वर झोन फिडर वरील डी व जी ब्लॉक मधील उद्योजकांना सतत  खंडित विद्युत पुरवठा बाबत भेडसावणारा प्रश्न आता मार्गी लागणार असलेचे नमूद केले.  

मा.स्वप्निल काटकर

मुख्य अभियंता

मायनर सबस्टेशन येथे आज नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म कार्यान्वित झाल्याचे जाहीर केले.

 सदरचे कामकाज हे वेळेत पूर्ण करून उद्योजकांच्या अडचणी दूर केल्यामुळे समाधान व्यक्त केले व महावितरणच्या उपस्थित अधिकारी व शाखाप्रमुख, ऑपरेटर्स यांचे अभिनंदन करण्यात आले  व पुढील कामकाज करणे करिता शुभेच्छा दिल्या.

मॅक च्या माध्यमातून उद्योजकांच्या विद्युत पुरवठा खंडित बाबत असणार्‍या  समस्या सोडविण्यासाठी सतत महावितरणच्या संबंधित अधिकारी वर्ग यांच्याकडे पाठपुरावा करून नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म मंजूर करून तो कार्यान्वित करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सहकार्य केले आहे त्याबद्दल मॅक पदाधिकारी यांचे विशेष आभार व्यक्त केले.  

पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रासाठी अजून तीन ते चार नवीन मायनर सबस्टेशन व एक EHV सबस्टेशन करणे करिता आम्ही येणारा काळात त्याचा पाठपुरावा करू त्यासाठी एमआयडीसी कडून भूखंड उपलब्ध करून घेणे करिता असोसिएशनचे सहकार्य मिळावे अशी ग्वाही मा.स्वप्निल काटकर साहेब यांनी दिली.

मा.दत्तात्रय भनगे –

कार्यकारी अभियंता

मा.दत्तात्रय भनगे साहेब यांनी सांगितले की, नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म मंजूर करून तो कार्यान्वित करण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मुख्य अभियंता स्वप्नील काटकर साहेब मॅक चे पदाधिकारी, मान्यवर उद्योजक बंधू तसेच महावितरण चे अधिकारी ऑपरेटर्स व ठेकेदार या सर्वांचे विशेष आभार मानले.

सदर ट्रान्सफॉर्म बसविण्यासाठी मॅक असोसिएशनचा सतत पाठपुरावा असल्यामुळे आज तो ट्रान्सफॉर्म महावितरण कडून कार्यान्वित करण्यात आला आहे. सदरचे काम वेळेत संबंधित ठेकेदार यांनी पूर्ण करून महावितरणला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानले.

आम्ही येणारा काळात तीन ते चार नवीन मायनर सबस्टेशन व एक EHV सबस्टेशन करणे करिता त्याचा पाठपुरावा करू व उद्योजकांना अखंडितपणे विद्युत पुरवठा देवू अशी ग्वाही मा.दत्तात्रय भनगे साहेब यांनी दिली.

सदर नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म कार्यान्वित करणे करिता विविध मान्यवरांनी सहकार्य केले बद्दल स्वागतपर सत्कार महावितरण कडून करण्यात आला.

सदर कार्यक्रमास महावितरण चे मुख्य अभियंता,मा.स्वप्निल काटकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भनगे,उप कार्यकारी अभियंता शिंदे, उप कार्यकारी अभियंता आहुजा, सदानंद मोरे, महावितरणचे इतर अधिकारी व स्टाफ तसेच मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे,ऑन सेक्रेटरी विठ्ठल पाटील, संचालक भावेश पटेल, ठेकेदार व इतर मान्यवर उपस्थित होते.

मा. श्री. उमेश बी. देशमुख साहेब,

नूतन प्रादेशिक अधिकारी, मऔवि महामंडळ, कोल्हापूर

यांचा मॅक च्या वतीने स्वागतपर सत्कार व पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या बाबत चर्चा करताना मॅक पदाधिकारी.