मा.तबस्सूम जमाल मगदुम, पोलीस निरिक्षक, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विविध विषयाबाबत बैठक संपन्न - MAKH

MAKH

मा.तबस्सूम जमाल मगदुम, पोलीस निरिक्षक, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विविध विषयाबाबत बैठक संपन्न

महोदय,

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या पोलीस कार्यालयाशी निगडीत असणार्‍या विविध समस्याबाबत मा.तबस्सूम जमाल मगदुम, पोलीस निरिक्षक, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन, गोकुळ शिरगाव यांच्या समवेत मॅक पदाधिकारी, संचालक मंडळ, सल्लागार व निमंत्रित सदस्य यांची *“कै.रामप्रताप झवर सभागृह” मॅक येथे दिनांक १५/१२/२०२४ रोजी बैठक संपन्न झाली.

सर्व प्रथम  मा. तबस्सूम जमाल मगदुम, यांची  गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन, गोकुळ शिरगाव च्या पोलीस निरिक्षक, पदी नियुक्ती झाल्याबद्दल मॅक च्या वतीने मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्वागतपर सत्कार करण्यात आला व पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पोलीस कार्यालयाशी निगडीत असणार्‍या समस्यांचे निवेदन देण्यात आले.

मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे साहेब व इतर पदाधिकारी यांनी खालील विषयबाबत सविस्तर चर्चा केली व सदर विषय सोडविण्यासाठी विनंती केली.

१. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात यावे व विशेषत: सोमवारी  सुट्टी दिवशी मोठ्या प्रमाणात करण्यात यावे.

२. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पोलीस चौकी उभारणीसाठी मिळालेल्या भूखंडावर पोलीस चौकी उभारणीचे काम सुरू झाले असून त्या करिता लागणारा स्टाफ लवकरात लवकर  उपलब्ध करून द्यावात.

३. एन एच 4-नॅशनल हायवे वरील असणार्‍या व पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये  प्रमुख मार्ग असणार्‍या लक्ष्मी टेकडी येथे अपघात होऊ नयेत या करिता सकाळी ७ ते १० व सायंकाळी ४ ते ८ ट्राफीक पोलीस यांची नियुक्ती करणेत यावी .

४. मॅक चौक येथे हातगाडी व इतर वाहतूक यांचे मोठया प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे अपघात होत आहेत व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. सदर ठिकाण चे अतिक्रमण काढणेत यावे तसेच सदर ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लावणेत आले असून त्याबाबत त्वरीत कार्यवाही व्हावी तसेच सदर चौकात सकाळी ७ ते १० व सायंकाळी ४ ते ८ ट्राफीक पोलीस यांची नियुक्ती करणेत यावी.  

५. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमण काढणे करिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडून मा. जिल्हापोलिस प्रमुख यांच्याकडे पोलीस बंदोबस्त मिळणे करिता मागणी केली असून पोलीस बंदोबस्त लवकरात लवकर देण्यात यावा व अतिक्रमण हटविण्यात यावे.  

६. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये मोबाईल, टू व्हीलर गाडी चोरीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी तसेच स्क्रॅप व इतर साहित्य गोळा करणेकरिता येणार्‍या महिला वर्ग मध्ये चोरी करणेचे प्रमाणे मोठया प्रमाणात दिसून येत असून त्याबाबत देखील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.  

७. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सुरू असणारे अवैधधंदे बंद करण्यात यावेत.  

                                                                                                                                                                                                     सदर वरील विषयाच्या अनुषंगाने मा.तबस्सूम मगदुम मॅडम यांनी सांगितले की, चोरीचे प्रमाण कमी करणेकरिता  नक्कीच योग्य ती उपाय योजना करून तसेच अतिक्रमण काढणे, ट्राफीक पोलीस नियुक्ती, पेट्रोलिंगमध्ये वाढ करणे, स्टाफ वाढविणे याबाबत देखील दखल घेवू व त्याबाबतची कार्यवाही करू या करिता आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असलेचे नमूद केले.                                                                                                                                                                                            सदर बैठकीचे आभार मॅक चे ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर यांनी मानले.

  कळावे,                                          

मोहन कुशिरे,अध्यक्ष,

विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष,

सुरेश क्षीरसागर,ऑन.सेक्रेटरी

अमृतराव यादव,ऑन.ट्रेझरर मॅक