नूतन आमदार मा. श्री. अमल महाडिक साहेब यांचा मॅक च्या वतीने सत्कार संपन्न - MAKH

MAKH

नूतन आमदार मा. श्री. अमल महाडिक साहेब यांचा मॅक च्या वतीने सत्कार संपन्न

आज बुधवार दिनांक २५/१२/२०२४ रोजी मा.श्री.अमल महाडिक साहेब यांचा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून नूतन आमदार पदी निवडून आल्याबद्दल मॅक च्या वतीने मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे साहेब यांच्या हस्ते व ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर अमृतराव यादव, मॅक चे संचालक संजय जोशी, संजय पेंडसे, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील, निमंत्रित सदस्य सत्यजित सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुके देवून सत्कार व अभिनंदन करण्यात आले. तसेच मॅक च्या वतीने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध समस्याचे निवेदन देण्यात आले व त्यामध्ये खालील विषय मांडण्यात आले.

१. वीज दरवाढ कमी करणे.

२. विदूत पुरवठा उद्योजकांना त्वरीत मिळणेकरिता इन्फ्रास्ट्रक्चर त्वरीत उपलब्ध करून देणे.

३. औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन मोठा इंजिनिअरिंग उद्योग येणे करिता पाठपुरावा करणे.

४. औद्योगिक क्षेत्रात गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन कार्यालकडून पेट्रोलिंग वाढविणे.                                                                                                        

वरील सर्व विषयाबाबत मा.श्री.अमल महाडिक साहेब यांच्या समवेत मॅक पदाधिकारी याची सविस्तर चर्चा झाली असून शासन स्तरावरील जे विषय आहेत ते सोडविण्यासाठी मा. मुख्यमंत्री, मा. उद्योगमंत्री यांच्या समवेत लवकरच औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी यांची बैठक आयोजित करू व सहकार्य करू तसेच स्थानिक पातळीवर असणारे विषय सोडविण्यासाठी मी नक्कीच आपणास मदत करेन अशी ग्वाही मा. आमदार अमल महाडीक साहेब यांनी दिली.