विद्यार्थी प्रशिक्षण (Apprenticeship) व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत मॅक येथे चर्चासत्र संपन्न - MAKH

MAKH

विद्यार्थी प्रशिक्षण (Apprenticeship) व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत मॅक येथे चर्चासत्र संपन्न

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या वतीने बुधवार दिनांक १०/०७/२०२४ रोजी बीटीआरआय चे पदाधिकारी, मॅक पदाधिकारी व मान्यवर सभासद यांचे एच.आर.व मॅनेजर यांच्या समवेत विद्यार्थी प्रशिक्षण (Apprenticeship) व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबतच्या चर्चासत्राचे आयोजन मॅक येथील कै.रामप्रताप झंवर सभागृह” येथे करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. एम. आर. बहिरशेठ, कळंबा आयटीआय चे कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार भास्कर घोरपडे, सेंट्रल गव्हरमेंट इम्प्लोमेंट च्या ऑफिसर मेघना वाघ, टाटा स्ट्राईव्ह चे स्वप्नील पाटील या मान्यवरांचा मॅक च्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला.

संजय पेंडसे – मनोगत

स्ट्राईव्ह प्रोजेक्ट अध्यक्ष व संचालक, मॅक

संजय पेंडसे साहेब यांनी केंद्र सरकारच्या मार्फत संपन्न झालेल्या स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बदल सविस्तर माहिती दिली व सदर प्रोजेक्ट मध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच बीटीआरआय चे पदाधिकारी यांचे देखील विशेष आभार व्यक्त केले.

हरिश्चंद्र धोत्रे – मनोगत

मॅक – अध्यक्ष

हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी सर्वप्रथम केंद्र सरकारच्या मार्फत संपन्न झालेल्या स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बदल बीटीआरआय चे पदाधिकारी, स्ट्राईव्ह प्रोजेक्ट अध्यक्ष व संचालक संजय पेंडसे, मान्यवर उद्योजक व संस्थेच्या स्टाफचे विशेष आभार व्यक्त केले.  सध्या उद्योजकांना कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्यामुळे  संस्थेच्या नूतन इमारतीमध्ये बीटीपी सेंटर लवकरच सुरू करीत असून बीटीपी सेंटर मधून विविध ट्रेड अंतर्गत ट्रेनिंग देऊन मनुष्यबळ पुरवठा करण्यास मदत होईल असे नमूद केले. मॅक चा दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी १७ वा वर्धापन दिन साजरा होत असून सदर वर्धापन दिनानिमित्त महा रक्तदान शिबीर व महा आरोग्य तपासणी शिबीर संस्थेच्या माध्यमातून आयोजित करीत असून  सदर रक्तदान व आरोग्य शिबिरामध्ये जास्तीत जास्त उद्योजक व कर्मचारी यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले.

श्री एम आर बहिरशेठ – मनोगत

वरिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार – कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री एम आर बहिरशेठ सर यांनी दरवर्षी 4000 पेक्षा अधिक विद्यार्थी आयटीआय मधून बाहेर पडतात त्यांना अप्रेंटीशीप मिळण्यासाठी कंपन्यांची आवश्यकता असते त्या अनुषंगाने विविध कंपन्यांनी कळंबा आयटीआय येथे रोजगार मेळावा आयोजित करावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अप्रेंटीशीप ची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच सदर उपक्रमासाठी टाटा स्ट्राईव्ह व बी टी आर आय यांची कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सहकार्य करू व येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आयटीआयच्या मुलांना ओजेटी साठी उद्योजकांनी उपलब्धता करून देण्याचे सांगण्यात आले व कळंबा आयटीआय येथे मॅक असोसिएशन मार्फत कौन्सलिंग सेमिनार घेण्यासाठी सांगण्यात आले.  

मोहन कुशिरे – मनोगत

मॅक- उपाध्यक्ष

मोहन कुशिरे यांनी अप्रेंटीशीप जागा उद्योजकांच्याकडे उपलब्ध आहेत व आयटीआय ने सहभाग घेऊन त्या संबंधित जागा भरण्यासाठी मार्गदर्शन करावे असे सांगण्यात आले तसेच लवकरात लवकर उद्योजकांना कर्मचारी उपलब्ध व्हावेत या करिता सर्वांनी प्रयत्न करावेत असे नमूद केले.

भास्कर घोरपडे – मनोगत

कनिष्ठ प्रशिक्षणार्थी- कळंबा आयटीआय, कोल्हापूर

भास्कर घोरपडे सर यांनी अप्रेंटीशीप मधून विद्यार्थ्यांना मिळणारे डायरेक्ट बेनिफिट ट्रेनी, डीबीटी मिळवून द्यावी व एम ए पी एस अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला २०२१ नंतर अप्रेंटीशीप पूर्ण केली असेल तर त्याला ४२ हजार रुपये मानधन राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे त्याची मॅक असोसिएशन मार्फत माहिती द्यावी अशी विनंती केली.  प्रत्येक तीन महिन्यानंतर असोसिएशनने आयटीआय ला भेट देऊन संबंधित ट्रेड ची ऑन जॉब ट्रेनिंगसाठी प्रयत्न करावेत व ओजेटी दरम्यान मुलांना राहण्यासाठी व कॅन्टीन उपलब्धतेची माहिती उद्योजकाकडून मिळावी व उद्योजक व आयटीआय कॉलेज एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडू असे नमूद केले.  फॉन्ड्री ट्रेड करिता मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी त्याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थांना देणे गरजेचे आहे व त्याबाबत जागृती त्यांच्यामध्ये निर्माण करणे करिता प्रयत्न करणे आवश्यक असलेचे नमूद केले. तद्नंतर टाटा स्ट्राईव्ह चे स्वप्नील पाटील यांनी कंपन्या मधील ओ जी टी सुरू करण्याबाबत माहिती देण्यात आली तसेच केंद्र शासन च्या एम्प्लॉयमेंट ऑफिसर मेघना वाघ मॅडम यांनी उद्योजकांना www.ncs.gov.in या संकेतस्थळावरून रिक्त पदांची माहिती अपलोड करावी जेणेकरून उद्योजकांना मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल असे नमूद केले व एम्प्लॉयमेंट ऑफिस च्या माध्यमातून लागणारे सहकार्य नक्कीच करू अशी ग्वाही दिली.

सदर कार्यक्रमामध्ये मॅक च्या वतीने स्ट्राईव्ह प्रोजेक्ट करिता मोलाचे सहकार्य केल्याबद्दल विविध कंपनी मधील एच.आर व मॅनेजर यांचा सत्कार करण्यात आला तसेच मौर्‍या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात १००० रोपांचे वृक्षारोपण केल्याबद्दल  मौर्‍या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे विशेष अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले व मॅक च्या वतीने मौर्‍या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रतींनिधी यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. एम आर बहिरशेठ, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार भास्कर घोरपडे, एम्प्लॉयमेंट ऑफिसर मेघना वाघ, टाटा स्ट्राईव्ह चे स्वप्नील पाटील, बीटीआर आय चे डंगोरे, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, स्ट्राईव्ह प्रोजेक्ट अध्यक्ष व संचालक संजय पेंडसे, ऑन.  ट्रेझरर सुरेश क्ष्रीरसागर तसेच विविध कंपनी मधील एच.आर व मॅनेजर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आभार मॅक चे ऑन. ट्रेझरर सुरेश क्ष्रीरसागर साहेब यांनी मानले.