मॅक कॅन्टीनच्या नूतन इमारत स्लॅब चे पूजन संपन्न

मॅक च्या नवीन इमारतीमधील मॅक कॅन्टीन च्या नूतन इमारत स्लॅब चे पूजन *आज शुक्रवार दिनांक 20/9/2024 रोजी सकाळी १०.०० वाजता मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे यांच्या शुभ हस्ते व अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे,ऑन सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक यशवंत पाटील व काॅन्ट्क्टर वैभव हांजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
नूतन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म उदघाटन समारंभ संपन्न

कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील सर्व उद्योजकांना कळविण्यास आनंद होत आहे की,मॅक च्या वतीने उद्योजकांना विद्युत पुरवठा त्वरित उपलब्ध व्हावा या हेतूने महावितरण कार्यालयाकडे सतत संस्थेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे महावितरण मायनर सबस्टेशन येथे नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म मंजूर झाला असून त्याचे उदघाटन महावितरण चे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते व मा.दत्तात्रय भनगे कार्यकारी अभियंता,मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे,ऑन सेक्रेटरी विठ्ठल पाटील, संचालक भावेश पटेल व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
स्ट्राईव्ह प्रकल्पा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मॅक च्या विद्यार्थ्यांना स्मॅक आयटीआय कडून प्रमाणपत्र प्रदान.

फाईव्ह स्टार – एमआयडीसी : ११ सप्टें. : स्मॅक आयटीआय कडून स्ट्राईव्ह प्रकल्पा अंतर्गत क्लासरूम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मॅक च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम मॅक च्या श्रीराम प्रताप झंवर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔवि महामंडळ यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विविध विषयाबाबत बैठक संपन्न….

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. पी.वेलरासू साहेब, व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. शिवाजी पाटील साहेब, मऔवि महामंडळ उद्योगसारथी,मुंबई येथे काल बुधवार दिनांक ०४/०९/२०२४ रोजी मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे यांनी भेट घेतली.
मा.उद्योगमंत्री यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विविध विषयाबाबत बैठक संपन्न….

काल शनिवार दिनांक ३१/०८/२०२४ रोजी मा.ना.श्री. उदय सामंत साहेब, उद्योगमंत्री यांची हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे व संचालक अनिल जाधव यांनी भेट घेतली व संस्थेच्या वतीने खालील विषयावरती सविस्तर चर्चा केली आणि सदर विषय सोडविण्यासाठी विनंती केली.
मा. उद्योगमंत्री यांच्या समवेत मॅक च्या AM-28 भूखंड मुदतवाढ बाबत बैठक संपन्न…

दिनांक 22/08/2024 रोजी मा. ना. श्री. उदय सामंत साहेब, उद्योगमंत्री यांच्या समवेत रोटरी समाज सेवा केंद्र, कोल्हापूर येथे मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी संस्थेच्या AM-28 भूखंडास दोन वर्षाची विनाशुल्क मुदतवाढ मिळणेबाबत दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मऔवि महामंडळ संचालक मंडळ बैठकीत झालेल्या ठराव बाबत सविस्तर माहीती दिली.
मॅक च्या AM-28 भूखंडास दोन वर्षाची विनाशुल्क मुदतवाढ मिळणे करिता..

मा. श्री. राजेश क्षीरसागर साहेब, कार्याध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ- कॅबिनेट दर्जा यांची काल दिनांक 21/8/2024 रोजी मॅक अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे समवेत चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष धनंजय दुगे यांनी सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे भेट घेऊन माहिती दिली.
मॅक च्या प्रांगणात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न…

मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या प्रांगणात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमास मा. श्री. मिलिंद सोनवणे, अग्निशमन अधिकारी, ईएसआयसी हॉस्पिटल चे डॉक्टर, मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर तसेच इतर मॅकचे संचालक, सल्लागार व निमंत्रित सदस्य व मान्यवर उद्योजक तसेच ईएसआयसी हॉस्पिटल व अग्निशमन कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती होते.
विद्यार्थी प्रशिक्षण (Apprenticeship) व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत मॅक येथे चर्चासत्र संपन्न

कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजक व कामगार बंधूंना लागणार्या मूलभूत विविध सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात
🌱🌱 *मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज च्या पुढाकाराने १००० रोपांचे वृक्षारोपण संपन्न 🌱🌱

कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व सामाजिक बांधिलकी जतन करीत मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज च्या पुढाकाराने लक्ष्मी टेकडी ते मॅक चौक या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करणेचा उपक्रम हाती घेतला